You are currently viewing भारत राष्ट्र समिती काय आहे , BRS Party व  का Join केल पाहिजे ?

भारत राष्ट्र समिती काय आहे , BRS Party व  का Join केल पाहिजे ?

भारत राष्ट्र समिती BRS Party। Bharat Rashtra Samiti । भारत राष्ट्र समिती तेलंगणा मॉडल । KCR BRS Party By

केज मतदार संघातील सर्व बंधू – भगिनींना नमस्कार 

भारत राष्ट्र समिती (BRS) तेलंगणा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. भारत राष्ट्र समिती (BRS) पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणून ओळखली जात होती. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) ची स्थापना २७ एप्रिल २००१ झाली आहे. परंतु २०२२ पासून  एक भारतीय राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात आहे.   ज्याची स्थापना तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री कलवकुंतला चंद्रशेखरराव यांनी केली आहे. ज्यांना KCR म्हणून ओळखले जाते.

आपण  एक शेतकरी आहेत . आपण एक विद्यार्थी आहात. आपण एक युवक  आहात. आपण एक महिला आहात. आपण एक दलित आहात. आपण एक आदिवासी  आहात. आपण एक ओबीसी आहात. आपण एक शोषित  आहात. आपण एक वंचित  आहात. आपण एक पीडित आहात. व वरील सर्व आपण एक जागृत मतदार आहात. आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. 

नेशनल क्राईम ब्युरो या केंद्र सरकार च्या अव्हलनुसार गेल्या ११ वर्षात महाराष्ट्र 60000 शेतकऱ्यांने आत्महत्या केल्या आहेत. याला जबादार कोण याला जबाबदार दुसरे तिसरे कोणी नसून या देशावर आणि या राज्यावर इतके वर्षे राज्य करणार राज्येकर्तेच याला जबाबदार आहेत.

Table of Contents

 काय समस्या आहेत महाराष्ट्रातील  शेतकऱ्यांच्या, आणि इतर घटकातील जनतेच्या

 • शेतीसाठी योग्ये दाबाची वीज लाइट नाही.
 • शेतीसाठी भेसळ मुक्त दर्जेदार बियाणे व खत  मिळत नाही.
 • शेतकऱ्यांना पेरणी साठी आर्थिक मदत होत नाही.
 • अधिक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान नाही.
 • शेतीसाठी मुबलक पाणी नाही.
 • शेतकऱ्यांनी पिकवलेल्या संप शेतमालाची खरेदी  सरकार करत नाही .
 • शेतीमालाच्या उत्पादित खर्चावर आधारीत योग्य भाव मिळत नाही.
 • शेतकऱ्यांच्या शेतीच्या नोंदीचे डिजिटल रेकॉर्ड नाही.
 • शेतकऱ्यांचा जीवन विमा नाही.
 • जेष्ठ नागरिकांना पाहिजे तेवढं मानधन नाही.
 • दिव्यांगांना पाहिजे तेवढं मानधन नाही.
 • गरजूना घरकुल भेट नाही.
 • दलित बंधूना व्यवसाय करण्यासाठी भांडवल नाही .
 • देशाबाहेर शिक्षण घेण्यासाठी १०० टक्के स्कॉलरशिप नाही.
 • जिल्हा परिषेद शाळा चालत नाहीत

महाराष्ट्रातील वरील सर्व समस्या सोडवण्याचे काम राज्येकर्त्यांना पाठीमागच्या ७० वर्षा पासून जमलं नाही. या उलट आपल्या शेजारील राज्ये तेलंगना ज्यांनी वरील सर्व समस्या पाठीमागच्या फक्त ९ वर्षात सोडवल्या आहे. हे शक्ये झाले आहे भारत राष्ट्र (BRS) समिती चे सर्वेसर्वो माननीय तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंन्द्रशेखरराव यांच्या नेतृत्वा खाली.

तेलंगणा राज्यात शेतकरी व इतर घटकातील लोकांसाठी कोणत्या  योजना आहेत.

01. शेतीसाठी मुबलक पाणी तेही अगदी मोफत.

मिशन भगीरथ अंतर्गत शेतीला सिंचनासाठी मुबलक पाणी व नदी जोड प्रकल्पामुळे १०० टक्के क्षेत्र सिंचना खाली आलेले आहे.  जगातली सर्वात मोठा प्रोजेक्ट म्हणून ज्याची नोंद आहे असा तीन वर्षात काळेश्वरम लिफ्ट इंरिगेशन द्वारा सर्व शेतकऱ्यांना शेतीस खरीप व रब्बी शाश्वत मोफत पाणी दिले जाते.

02. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी २४ तास उच्च प्रतिची वीज पुरवठा मोफत.

 देशातील केवळ तेलंगणा हे राज्ये आहे शेतकऱ्यांसाठी २४ तास दर्जेदार वीज पुरवठा मोफत करत आहे . शेतकऱ्यांकडे कितीही शेती आणि विद्युत पंप असुद्या कसलीही विनंती अर्ज न करता सरकारच्या वतीने आम्ही वीज मोफत देतो. २४ तास वीज मोफत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पंप जळणे बंद झाले, आज तेलंगणात ३० लाख विद्युत मोटार कनेक्शन असून ३ लाख कनेक्शन अनधिकृत आहेत

03. शेतीसाठी भेसळ मुक्त दर्जेदार बियाणे व खत  मिळते.

शेतकऱ्याने मागवलेले बियाणे हे भेसळमुक्त दिले जाते . बियाणे कोणत्या प्रकारचे आहे या वर दर निश्चित होतात. शेतकऱ्याने  बियाण्याची  एक सिस्टिम च्या माध्यमातून बुकिंग नोंदणी केल्यास मोबाईल वर एक SMS येतो व हा SMS दाखवून शेतकऱ्याने बियाणे व खत दिले जाते. 

04. शेतकऱ्यांना पेरणी साठी 10000 रु  आर्थिक मदत दिली जाते. 

शेतकऱ्यांना खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगाम साठी तेलंगणा सरकार कडून, किसान बंधू , रयतु बंधू या योजने अंतर्गत, प्रति एकरी, प्रति वर्षाला १०००० रुपये अनुदान दिले जाते. 

06. अधिक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञाना चा वापर केला जातो.

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सहज रित्या करता यावा यासाठी ५००० एक्कर शेतीसाठी एक शेतकरी मंच तयार केला आहे. व या मंच च्या माध्यमातून  शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन केले जाते.

07. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या संपूर्ण शेतमालाची खरेदी सरकार करते .

तेलंगणा हे एक असे राज्य आहे. ज्या ठिकाण तेलंगणा सरकारचे ७००० खरेदी केंद्र आहेत.या खरेदी केंद्राच्या माध्येयमातून शेतीमालाच्या उत्पादित खर्चावर आधारीत योग्य भाव दिला जातो.

09. शेतकऱ्यांच्या शेतीच्या नोंदीचे डिजिटल रेकॉर्ड फक्त अर्ध्या तासात मिळते.

तेलंगणा हे एक असे राज्य आहे. ज्या ठिकाणी तलाठी हे पद नाही. कारण जमिनीचे सर्व रेकॉर्ड हे Dharani Telangana या पोर्टलवर डिजिटल केल्यामुळे कुठलाही जमिनीचा व्यवहार हा फक्त अर्ध्या तासात पूर्ण होतो. जमिनीचा फेरफार सुद्धा अर्ध्या तासात पूर्ण होतो.

10. शेतकऱ्यांचा 5 लाख रुपये जीवन विमा.

भारत राष्ट्र समिती,तेलंगणा राज्य येथील शेतकऱ्यांनचा  अपघाती व नैसर्गिक वयाच्या  १८ ते ५९ मध्ये मृत्यू झाल्यास रायथू बिमा, Rythu Bima या योजने अंतर्गत, शेतकऱ्यांच्या वारसाला ५ लाख रुपये १० दिवसाच्या आत विमा दिला जातो. सर्व शेतकऱ्यांचे विम्याचे प्रीमियम तेलंगणा सरकार भरते .

11. जेष्ठ नागरिक व निराधार 2016 रुपये  मानधन मिळते.

भारत राष्ट्र समिती, तेलंगणा राज्य,येथील जेष्ठ नागरिक व निराधार यांना आसरा पेंन्शन  Aasara Pensions या योजने अंतर्गत, गरजा भागतील या गोष्टीचा विचार करून २०१६ रुपये मानधन दिले जाते.

12. दिव्यांगांना 4016 रुपये  मानधन मिळते .

भारत राष्ट्र समिती, तेलंगणा सरकार, यांनी प्रत्येक घटकातील लोकांचा विचार केला आहे. दिव्यांगण समाजातील असा घटक आहे, कि त्यांचे खूप हाल आहेत, यांचे हाल होऊ नाहीत याचा विचार करून, दिव्यंगणाला प्रति महिना आसरा पेंन्शन  Aasara Pensions या योजने अंतर्गत, ३०१६ रुपये मानधन दिले जाते.

13. गरजूना घरकुल 2 बेड रूम  किचेन 100 टक्के अनुदान.

भारत राष्ट्र समिती हा तेलंगणातील एक प्रमुख पक्ष आहे. तेलंगणा हे भारतातील एक असे राज्य आहे.गरीब गरजू लोकांना 100 टक्के अनुदानावर 2 बेडरूम किचेन घरे दिली जातात.

14. दलित बंधूना 10 लाख रुपय व्यवसाय करण्यासाठी 100 टक्के सबसिडी .

भारत राष्ट्र समिती हा तेलंगणातील एक प्रमुख पक्ष आहे. व याच पक्षाचे तेलंगणा राज्यात सरकार आहे. तेलंगणा राज्यात प्रत्येक अनुसूचित जाती, व दलित कुटुंबातील एका व्यक्तीला उत्पन्न वाढवण्यासाठी  व्यवसाय करण्यासाठी BRS, म्हणजेच तेलंगणा सरकार  10 लाख रुपय भांडवल दलित बंधू रयतू बंधू या योजने मार्फत 100 टक्के अनुदान दिले जाते.

भारत राष्ट्र समिती हा तेलंगणातील एक प्रमुख पक्ष आहे. व याच पक्षाचे तेलंगणा राज्यात सरकार आहे. तेलंगणा राज्यात प्रत्येक अनुसूचित जाती, व दलित कुटुंबातील एका व्यक्तीला उत्पन्न वाढवण्यासाठी  व्यवसाय करण्यासाठी BRS, म्हणजेच तेलंगणा सरकार  10 लाख रुपय भांडवल दलित बंधू रयतू बंधू या योजने मार्फत 100 टक्के अनुदान दिले जाते.

15. देशाबाहेर उच्च शिक्षण घेण्यासाठी 20 लाख  स्कॉलरशिप.

भारत राष्ट्र समिती हा तेलंगणातील एक प्रमुख पक्ष आहे. तेलंगणा राज्यातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर उच्च शिक्षण डॉक्टरेट अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी पात्र SC,ST आणि OBC श्रेणीतील विद्यार्थ्यांना २०लाख रुपय Welfare Department,Government of Telangbna च्या माध्येयमातून स्कॉलरशिप मिळते,या स्कॉलरशिप चे कुठलीही परतफेड नाही . नियम व अटी लागू .

16. कल्याण लक्ष्मी शादी मुबारक योजना 100116 रुपये

कल्याण लक्ष्मी हि तेलंगणा राज्यातील एक योजना आहे या योजने अंतर्गत मुलीच्या लग्न साठी १००११६ रुपये मदत दिली जाते . नियम व अटी लागू .

महाराष्ट्रतिल सर्व जनतेने एक विचार करणं गरजेचे आहे.  भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष होत आहेत. तरीही काही शहर असे आहेत ज्या ठिकाणी ८ दिवसाला एक वेळ पाणी भेट आहे. हे फक्त एक उदाहरण आहे असे अनेक उदाहरण आहेत. आणि एक तेलंगणा राज्य आहे. ज्या ठिकाणी शेतीसाठी जगातील सर्वात मोठे धरण  काळेश्वरम लिफ्ट इरिगेशन सिस्टिम  हे आहे व पिण्यासाठी मिशन भगीरथ हा सर्वात मोठा प्रोजेक्ट तेलंगणा मध्ये आहे.  हे शक्य झाल आहे, भारत राष्ट्र समिती (BRS) चे सर्वेसर्वो एक ध्येय वेडा माणूस सध्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय श्री. के. चंद्रशेखर राव यांच्या स्वप्नातून बनलेलं तेलंगणा मॉडेल. 

हेच स्वप्न घेऊन ( तेलंगणा मॉडेल )  भारत राष्ट्र समितीचे माननीय श्री. के. चंद्रशेखरराव महाराष्ट्रात  आलेले आहेत. यांचे हात मजबूत करण्यासाठी,आपली साथ  खूप महत्वाची आहे. आज पर्येंत आपण बऱ्याच राज्यकर्त्यांना संधी दिली आहे पण शेतकऱ्यांच्या हितासाठी एकही योजना या राज्य कर्त्यांनी केली नाही. भारत राष्ट्र समितीचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असणार आहे. हे सरकार आपल्या जीवनात परिवर्तन आणल्याशिवाय राहणार नाही. आपण एक जागृत मतदार असताल तर एक संधी भारत राष्ट्र समितीला द्यावी हीच विनंती.

आपण सहमत असाल तर खाली दिलेले जॉईन BRS या बटनाला क्लीक करून आपली  सहमती नोंदवा . व BRS  ला साथ द्या.! “आपकी बार किसान सरकार “ 

महाराष्ट्रातील जनतेनं भारत राष्ट्र समिती का जॉईन केले पाहिजे.

खालील पैकी एकही समस्या आपल्याला भेडसावत असेल तर आपण निशचित BRS ला साथ द्याल.

 • शेतीसाठी मोफत २४ तास वीज मिळते का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS 
 • शेतीतील उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळतो का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS
 • शेतीसाठी मोफत २४ तास पाण्याचे नियोजन आहे का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS 
 • शेतीसाठी खरीप व रब्बी च्या मशागतीसाठी काही प्रति एक्कर १०००० रुपय प्रति वर्षी  अनुदान स्वरूपात रक्कम मिळते का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS
 • शेतकरी राजाचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ५ लाख रुपय विमा भेटतो का ?  उत्तर नाही असेल तर जॉईन BRS
 • दलित कुटूंबातील व्यक्तीला व्यवसाय करण्यासाठी १० लाख रुपय भांडवल अनुदानाच्या स्वरूपात मिळते का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS
 • देशाबाहेर उच्च शिक्षण घेण्यासाठी २० लाख  स्कॉलरशिप मिळते का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS
 • जेष्ठ नागरिक व निराधार २०१६ रुपये  मानधन मिळते का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS
 • दिव्यांगांना ४०१६ रुपये  मानधन मिळते का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS
 • गरजूना घरकुल २ बेड रूम  किचेन १०० टक्के अनुदान मिळते का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS
 • शेतकऱ्यांच्या शेतीच्या नोंदीचे डिजिटल रेकॉर्ड व फेरफार  फक्त अर्ध्या तासात मिळतो का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS
 • शेतीसाठी भेसळ मुक्त दर्जेदार बियाणे व खत  मिळते का ? उत्तर नाही असेल तर जॉईन BRS
 • महाराष्ट्रासाठी भारत राष्ट्र समिती योग्य पर्याय राहील का ? उत्तर होय असेल तर जॉईन BRS
 • भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात प्रभावीपणे योजना राबवू शकते का? उत्तर होय असेल तर जॉईन BRS
 • महाराष्ट्रासाठी भारत राष्ट्र समिती योग्य पर्याय राहील का ? उत्तर होय असेल तर जॉईन BRS

Leave a Reply